महाराष्ट्रात 7 प्रादेशिक विभाग आहेत. नैसर्गिक सीमामहाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग ,कोंकण,सागरी किल्ले -,बेटे,सह्याद्री
महाराष्ट्रात 7 प्रादेशिक विभाग आहेत.
1. कोंकण2. देश
3. घाटमाथा
4. मावळ
5. खानदेश
6. मराठवाडा
7. विदर्भ (वऱ्हाड)
~ महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी 800 किमी आहे. तर दक्षिण उत्तर लांबी 720 किमी आहे.
महाराष्ट्र नैसर्गिक सीमा :-
1. वायव्य - सातमाळा डोंगर, गाळणा टेकड्या, दरेकसा टेकड्या.2. उत्तर - सातपुडा डोंगर, विल्गड टेकड्या.
3. ईशान्य - दरेकसा टेकड्या.
4. पूर्व - चिरोली टेकड्या, गायखुरी डोंगर, भामरागड डोंगर.
5. दक्षिण - हिरण्यकेशी नदी, नंदी नदी, तेरेखोल नदी.
6. पश्चिम - अरबी समुद्र.
महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग
1. कोंकण2. सहयाद्री किंवा पश्चिम घाट
3. पठारी किंवा दक्खनी प्रदेश
कोंकण
~ कोंकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी 720 किमी आहे. उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेत तेरेखोल नदीपर्यंत विस्तार.~ सरासरी रुंदी 30 ते 60 किमी . कोकणची रुंदी सर्वत्र सारखी नाही.
~ कोकण एक सलग मैदान नाही हा डोंगरदरयानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
~ कोकणचे दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे दोन विभाग पडतात. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो तर उर्वरित जिल्ह्यांचा उत्तर कोकणात समावेश होतो.
~ उत्तर कोकण कमी खडकाळ व डोंगराळ नसून त्यात लोकसंख्या , शहरे व नागरीकरण जास्त आहे.
~ याउलट दक्षिण कोकण जास्त खडकाळ व डोंगराळ असून त्यात शहरे आणि लोकसंख्या कमी आहे.
~ पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला 'खलाटी' म्हणतात. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास 'वलाटी' असे म्हणतात.
~ कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावर खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.
सागरी किल्ले -
1. वसईचा किल्ला2. जंजिरा
3. सुवर्णदुर्ग
4. विजयदुर्ग
5. सिंधुदुर्ग
बेटे
1. मुंबई2. साष्टी
3. खांदेरी व उंदेरी
4. घारापुरी व अंजदीव
कोकण किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे व आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे.
~ मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबई जवळच न्हावा शेवा हे बंदर उभारलेले आहे . (JNPT - Jawaharlal Nehru Port Trust)
~ महाराष्ट्रात एकूण 49 बंदरे आहेत.
सह्याद्री
~ भारताच्या पश्चिम किनारपतट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे.~ सह्याद्री दक्खनची पश्चिम सीमा निश्चित करतो.
Comments
Post a Comment